loader
Breaking News
Breaking News
Foto

काळसेवाडी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरी

बांदा (प्रतिनिधी) - येथील काळसेवाडी परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवा उद्योजक सिद्धेश शिरोडकर यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी ही धाडसी घरफोडी केली. विशेष म्हणजे, शिरोडकर यांचे घर मुख्य हमरस्त्याला लागून असूनही चोरट्यांनी दिवसाढवळ्या हे कृत्य केल्याने परिसरात भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरोडकर यांच्या घरातील देवाच्या गाभाऱ्यातील भांडी व किरकोळ साहित्य चोरीला गेले आहे. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल न केल्याने बांदा पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नाही. बांद्याचा आठवडा बाजार असल्याने शहरात मोठी वर्दळ होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शिरोडकर यांच्या बंद घराला लक्ष्य केले. सिद्धेश शिरोडकर यांचे बांदा बाजारपेठेत कपड्याचे दुकान असून, दुपारी नेहमीप्रमाणे ते जेवणासाठी घरी आले असता त्यांना मुख्य दरवाज्याची कडी आणि कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरात प्रवेश केल्यावर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.​ या घटनेची माहिती मिळताच मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बांदा पोलिसांना याबद्दल अवगत केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg