loader
Breaking News
Breaking News
Foto

पुण्याकडे निघालेला ठाण्यातील अल्पवयीन तरुण बेपत्ता

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे रेल्वे स्थानकावरून जलद लोकलने पुण्याकडे निघालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा प्रवासातच बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. त्याच्या अपहरणाची तक्रार ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असून पोलीस अपहृत मुलाचा शोध घेत आहेत. अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत, ते पुणे, मावळ येथील राहणारे आहेत. तसेच त्यांचा मुलगा हा मागील महिनाभरापासून ठाण्यातील कापुरबावडी येथे नातेवाईकांकडे राहत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२० फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.५५ वाजता त्याला ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वरून कर्जत फास्ट लोकलच्या जनरल डब्यात बसवून पुण्याकडे रवाना करण्यात आले. मात्र त्यानंतर तो घरी पोहोचला नसल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला, तरीही त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने फूस लावून त्याचे अपहरण केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg