loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी अमित खोत यांची निवड

मालवण (प्रतिनिधी) : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने १९ मार्च गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे भव्यदिव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण शहरातून निघणार आहे. स्वागत यात्रेचे हे 23 वे वर्ष असून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी अमित खोत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संस्थापक भाऊ सामंत व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत भरड दत्तमंदिर येथे समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी अमित खोत यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी संयोजक प्रशांत हिंदळेकर, बंटी केनवडेकर, भूषण साटम, रत्नाकर कोळंबकर, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर, कृष्णा ढोलम, सौगंधराज बादेकर, अरविंद मयेकर, अमृता फाटक, अस्मिता निव्हेकर यांसह अन्य सदस्य उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

भव्यदिव्य स्वरूपात चित्ररथ, आकर्षक चलचित्र देखावे, ढोलपथक, वेशभूषा स्पर्धक आणि तमाम मालवणवासीय यांच्या सहभागातून भगव्या उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा गुढी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी निघणार आहे. त्या दृष्टीने नियोजन व प्राथमिक चर्चा करण्यात आली असून पुढील महत्वपूर्ण बैठक शुक्रवार 27 फेब्रुवारी सायंकाळी 5 वा. भरड दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg