loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये कर्तव्यावर रुजू होण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा अंत

खेड : कर्तव्य बजावण्यासाठी वैद्यकीय रजेवरून पुन्हा सेवेत रुजू होण्यास आलेल्या एका शिक्षकाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. २३ रोजी घडली. धर्मराज नामदेव वाडकर (वय ५६, रा. पाग, ता. चिपळूण) असे निधन झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ही घटना दुपारी १.२६ वाजण्याच्या सुमारास कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराज वाडकर हे जिल्हा परिषदेच्या लोटे माळ या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी ते पंचायत समिती शिक्षण विभागात वैद्यकीय रजेवरून परतल्यानंतर पुन्हा हजर होण्याकरिता आवश्यक असलेला अहवाल देण्यासाठी आले होते. त्यांनी आपला अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा केला. मात्र कार्यालयात बसलेले असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे नेले. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. कर्तव्यदक्ष, शांत आणि विद्यार्थीप्रिय असलेल्या वाडकर यांच्या अकाली निधनामुळे शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी (गृहिणी) आणि नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेला मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg