loader
Breaking News
Breaking News
Foto

संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ

संगलट खेड (इक्बाल जमादार) - राष्ट्रसंत, वैराग्य मूर्ती गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंती निमित्त उपाध्यक्ष वसंत पिंपळकर प्रयोजित संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेतल्या. त्याचा बक्षीस समारंभ संस्थेचे अध्यक्ष सुभाष कदम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी चिपळूण पेठमाप विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात झाला. निबंध स्पर्धा शालेय गट (8 वी ते 10वी) मध्ये सार्थक वैभव कदम - पेठमाप, चिपळूण - प्रथम, सार्थक प्रकाश महाडिक -भेलसई, ता. खेड - द्वितीय, अंतरा अशोक इंगवले -बुरंबाड ता. संगमेश्वर - तृतीय, पूर्वी विवेक कदम -ओमळी, ता. चिपळूण, नीरजा नितीन कदम- पेठमाप व प्रांजल योगेश चाळके - गोवीळ महाविद्यालयीन गट - श्लोका नवनीत भोसले - खेड - प्रथम, रिया अशोक चाळके - गोविळ, ता. लांजा- द्वितीय, आर्या निलेश चाळके - पाटपन्हाळे, ता. गुहागर - तृतीय, प्रतिक्षा दीपक कदम -पेढाबे, ता. चिपळूण - उत्तेजनार्थ, सई संजय मिरगांवकर - बहादूरशेख, चिपळूण - उत्तेजनार्थ रोख बक्षीसे व सन्मान पत्र देण्यात आले. प्रा. विनायक होमकळस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. सर्व यशस्वी विधार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाचे सचिव, पुण्याचे प्रा. कचेश्वर राऊत, पूज्य गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस, सल्लागार आबा महाडिक, हसमुखभाई पांगारकर, दीपक म. कदम, संतोष कदम, श्रीकृष्ण शिंदे, सावित्री होमकळस, कार्याध्यक्ष मनोज शिंदे, उपाध्यक्ष सुयोग घाग, सचिव नवनीत भोसले, खजिनदार राजू भोसले, सहसचिव दिनेश कदम, संघटक दुर्गेश्वर रोकडे, नथुराम जांभुळकर, लॉंड्री अध्यक्ष महेश भोसले, युवक अध्यक्ष नितीन चाळके, महिला कार्याध्यक्ष वैशाली शिंदे, दापोली तालुकाध्यक्ष प्रथमेश दुर्गावळे, खेड तालुकाध्यक्ष मुकेश भोसले, चिपळूण तालुकाध्यक्ष हेमंत कदम, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम, लांजा - राजापूर अध्यक्ष संदेश चव्हाण सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन महिला जिल्हाध्यक्षा अंजली पिंपळकर यांनी केले. तर लॉंड्री सचिव रितेश महाडिक यांनी आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg