loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरप्याची सुकन्या गौरीनंदा सावंत हिला सीई वर्ल्ड वाईड लीडरशिप अवॉर्ड २०२६ प्रदान

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील गौरीनंदा आबाजी सावंत यांना सीई वर्ल्ड वाईड (पुणे) या संस्थेकडून दिला जाणारा प्रोफेशनल एक्सलन्स इन जनरल ऍडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी चिंचवड येथील हॉटेल सयाजीमध्ये हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळ किरबेट संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबाजी सावंत यांच्या गौरीनंदा कन्या आहेत. सीई वर्ल्डवाईड हे आपल्या देशातील सगळ्यात मोठे फॅसिलिटी मॅनेजर आणि कंपनीचे फोरम आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षी हया फोरम तर्फे देशातील सगळ्या प्रादेशिक रचनेनुसार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींचा गौरव केला जातो. हया कंपनी चे वैशिष्ट्‌य असे की स्वतः ती व्यक्ती किंवा एखादी कंपनी नाव सुचवू शकत नाही तर भारतभर असलेले ज्यूरी मेंबर्स ह्यांची निवड करतात. ही पद्धत पण खूप मोठी आणि अवघड असते. नॉमिनेट केलेल्या इम्प्लॉईसाठी बाकीचे ज्यूरी मतदान करतात. हे ज्युरी आपण आधी केलेल्या कामाचा संपूर्ण आढावा घेतात आणि मग मतदान होते. हया वर्षीचा पुणे (वेस्ट रिजन) मध्ये हा पुरस्कार गौरीनंदा सावंत ह्यांना मिळाला. त्यांना लीडरशीप फॉर स्कील अँड जनरल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हा मानाचा पुरस्कार मिळाला.

टाइम्स स्पेशल

फॅसिलिटी मॅनेजर हे असे फिल्ड आहे, ज्या मध्ये ९० टक्के पुरुष मक्तेदारी आहे. अश्या अवघड क्षेत्रात सतत २२ वर्ष काम करून आपले स्थान त्यांनी निर्माण केले आहे. आता गौरीनंदा हया मॅप्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जनरल मॅनेजर ऑपरेशन या पदावर पाचगणी मध्ये कार्यरत आहेत. याआधी त्यांनी रत्नागिरी मधील भारत सरकार च्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल एनएसडीसी सेंटरचे प्रिन्सिपॉल पद सांभाळले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg