रत्नागिरी (वार्ताहर) - स्वातंत्र्यपूर्व काळात स्पृश्य-अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून स्वखर्चाने जागा खरेदी करुन त्या जागेत पतितपावन मंदिराची उभारणी करणारे दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या नामफलकाची पाटी मंदिरावर लवकरच लावण्यात येईल, प्रवेशद्वारावर जशी ती लावण्यात आली आहे, तशीच मंदिराच्या दर्शनी भागावरही असेल, अशी निसंदिग्ध ग्वाही पतितपावन मंदिराचे अध्यक्ष उन्मेश शिंदे यांनी दिली. दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी शहरातील श्रीभैरी मंदिरापासून निघालेल्या रॅलीची सांगता पतितपावन मंदिरात झाली. यावेळी झालेल्या सभेत शिंदे बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय भंडारी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, तालुकाचे अध्यक्ष राजीव कीर, भोई समाजाचे सचिव सदानंद महाकाळ, मराठा समाजाचे राजेंद्र फाळके, तेली समाजाचे प्रदिप दांडेकर, नाभिक समाजाचे अध्यक्ष प्रकाश हातखंबकर, कुणबी समाजाचे सलिल डाफळे, त्वष्ठा कासार समाजाचे संकेत डेरे, महेंद्र कोसुंबकर, गोविंद भारद्वाज, परीट समाजाचे राजेंद्र नेरकर, वाणी समाजाचे राजन शेट्ये (नगरसेवक), चर्मकार समाजाचे विजय खेडेकर (समाजकल्याण सभापती), कटबू समाजाचे जिल्हाध्यक्ष बी.टी.मोरे, उद्योजक प्रसन्न आंबुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजीव कीर यांनी पतितपावन मंदिराच्या बांधकामावरुन वारंवार वाद निर्माण होतात, ते टाळण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने मंदिराच्या दर्शनी कमानीवर असलेला नामफलक मंदिराच्या दर्शनीभागावर लावावा, अशी सूचना केली. त्यावर अध्यक्ष शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच ही व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी कीर यांनी भागोजीशेठ कीर यांच्या महान कार्याची उपस्थितांना माहिती दिली. मुंबईतील मरीन लाईन्सची भिंत ते रत्नागिरीतील विविध मंदिरे आणि मिरकरवाडा येथील स्मशानभूमी, त्यांच्या अतुलनीय दानशूरपणाबद्दल उपस्थितांना त्यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी मुंबईतील भागोजीशेठ कीर यांच्या महान कार्याचा उलगडा केला. शापूरजी पालनजी मेस्त्री (रतन टाटांचे वंशज) आणि भागोजीशेठ कीर यांनी मुंबईत बांधलेल्या असंख्य इमारती, दादर स्मशानभूमीला स्वखर्चाने दिलेला ९ एकरचा भूखंड यासह ठळक बाबींचा उल्लेख करत त्यांच्या कार्याची महती पटवून दिली. यानंतर सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. हजारों नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. त्याचवेळी मंदिरात सहभजनाचा कार्यक्रमही रंगला.










































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.