loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

खेड (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत दापोली विधानसभा क्षेत्रातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा व्हावा यासाठी सोमवारी खेड येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समस्या जागेवरच सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. माँसाहेब मीनाताई ठाकरे नाट्यगृहाजवळील खेड नगर वाचनालय येथे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी आयोजित केलेल्या या जनता दरबारात विविध प्रकारच्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जनता दरबारात उपस्थित प्रत्येक समस्याग्रस्तांचे बाळा खेडेकर यांनी स्वतः जातीने दखल घेत त्यातील बहुतेक प्रश्न मार्गी लावले तर काही प्रश्नांची तड लावण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला सांगण्यात आले. आठवडाभरात प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर शिवसेना स्टाईलने त्याची दखल घेतली जाईल, असा इशाराही देण्यात आला. बहुतेकांनी स्वतःच्या वैयक्तिक प्रश्नांपेक्षा सार्वजनिक हिताच्या समस्या मांडल्या. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या २३ तारखेला शिवसेनेकडून जनता दरबार घेण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg