loader
Breaking News
Breaking News
Foto

मच्छिमार्केट परिसरात चक्क कोल्हा...!

रत्नागिरी शहरात आता सगळेच जंगलातले प्राणी एक एक करुन अवतरायला सुरुवात झालीय. बिबट्या, गव्हा रेडा यांच्या पाठोपाठ आता भरवस्तीत कोल्ह्याचेही दर्शन व्हायला लागले आहे. आज पहाटे मच्छिमार्केट परिसरातील नवलाई तलाव परिसरात कोल्हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. जंगलातून वाट चुकलेला हा कोल्हा सकाळसकाळ या परिसरात फिरत होता, मात्र माणसाची चाहूल लागताच तो बिथरला आणि पळून गेला. मात्र आता बाजारपेठेत या कोल्ह्याची जोरदार चर्चा रंगत आहे. जुन्या जाणत्या लोकांच्या मते सकाळसकाळ कोल्ह्याचे दर्शन शुभ मानले जाते, त्यामुळे या कोल्ह्याच्या दर्शनाने परिसरात आश्‍चर्यासोबतच आनंदाचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg