loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात २२५ मराठी शाळा बंद, सरकारची विधानसभेत माहिती

मुंबई - राज्याच्या विधानसभेमध्ये प्रश्‍नोत्तरांच्या माध्यमातून एक गंभीर विषय सर्वांसमोर मांडण्यात आला. राज्यातील तब्बल २२५ मराठी शाळा बंद होत असल्याची माहिती, सरकारच्या शिक्षण विभागाने दिली. यामध्ये कोकण, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या पाचही विभागातील शाळांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरी भागासोबत ग्रामीण भागातील पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढतो आहे, त्यामुळे गावागावातील मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले आहे. ज्यामध्ये स्पर्धात्मक खिक्षण, रोजगाराच्या संधी आणि जागतिक स्तरावरील संवाद कौशल्य यासाठी पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देत असल्याचे समोर येत आहे. याच कारणामुळे मराठी शाळांची संख्या आता कमी होवू लागली आहे. अशातच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे स्थलांतर खासगी इंग्रजी शाळांची वाढ आणि लोकसंख्येतील बदल याचा मोठा परिणाम मराठी शाळांवर होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg