loader
Breaking News
Breaking News
Foto

लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हफ्ता जमा

मुंबई- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया 23 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

टाइम्स स्पेशल

ई-केवायसी करताना चुकीची माहिती दिल्याने अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला होता. यामुळे महिलांमध्ये नाराजी होती, याची दखल घेत सरकारकडून लाडकी बहीण ई-केवायसी पोर्टल आजपासून सुरू करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने महिलांमध्ये संभ्रम होता. आता राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केले असून महिलांना आपल्या अर्जात 31 मार्चपर्यत दुरुस्ती करता येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg