loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात १३ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुण गजाआड

ठाणे (प्रतिनिधी)- १३ वर्षीय मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग आणि अश्लील चाळे केल्याची घटना ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी संशयीत आरोपी अजीज अनीस सय्यद याच्या विरोधात मारहाण आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारदार हे ठाण्याच्या रूपदेवीपाडा येथे राहणारे असून त्यांची १३ वर्षाची अल्पवयीन मुलगी ५ वी इयत्तेत शिकणारी आहे. घटनेच्या दिवशी संशयीत आरोपी अजीज अनीस सय्यद(२६) रा. दत्त मंदिराच्या मागे, इंदिरा नगर ठाणे याने मुलीला रस्त्यात अडवून थांबवले तिचा हात पकडून तिला ओढत मिठी मारली. त्याला मुलीने विरोध केल्यानंतर संशयीत आरोपी याने तिला हाताने चापटीने मारहाण केली. त्यात १८ फेब्रुवारी रोजीच्या घटनेनंतर घृणास्पद प्रकारची विचारणा करण्यासाठी २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५-३० वाजता गेले असता तक्रारदार याना संशयीत आरोपी अजीज याने मारहाण केली. तक्रारदाराच्या डाव्या कानाला इजा झाली. सादर प्रकरणाची तक्रार दाखल होताच श्रीनगर पोलिसांनी मारहाण आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून संशयीत आरोपी अजीज अनीस सय्यद याला अटक केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg