loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात टेस्ट ड्राईव्ह करताना चारचाकी वाहनाला आग, सुदैवाने तिघेजण बचावले

ठाणे (प्रतिनिधी) - नशीब बलवत्तर म्हणून तिघेजण बचावले असल्याची घटना ठाण्यात घडली. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट परिसरात टेस्ट ड्राईव्ह करताना चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. वाहनाला आग लागताच वाहनातील तिघेही त्वरित वाहनाच्या बाहेर पडल्याने बचावले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घोडबंदर रोडवरील पातळीपाडा हिरानंदानी इस्टेट परिसरात ठाणे पालिकेच्या उद्यानाजवळ चारचाकी वाहनाला टेस्ट ड्राईव्ह दरम्यान आग लागल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला एका प्रत्यक्षदर्शी तलरेजा नावाच्या महिलेने दिली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली. तसेच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले.

टाइम्स स्पेशल

सदर टाटा कंपनीचे कर्मचारी असलेले वाहन चालक अजय गायकवाड हे त्यांच्यासह दोन ग्राहक त्या वाहनामधून प्रवास करत होते. आग लागताच तिघांनीही प्रसंगावधान राखत तात्काळ वाहनाबाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला. या आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg