loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुका पाणी टंचाई मुक्त करण्याचा आमदार किरण सामंत यांचा निर्धार! ४ कोटी २५ लाखांचा आराखडा तयार

केळंबे-लांजा (सिराजनेवरेकर): लांजा तालुका पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी लांजा पंचायत समितीने ४२ गावे आणि ९६ वाड्यांचा समावेश असलेला ४ कोटी २५ लाख ८३ हजार रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला असुन लांजा तालुका पाणि टंचाई मुक्त करण्याचा निर्धार आमदार किरण सांमत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे. या आराखड्याद्वारे संभाव्य टँकरग्रस्त लोकांना पाणी टंचाई काळात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याऐवजी नळ पाणी पुरवठा योजना, दुरूस्ती, विहीर खोदने, नळपाणी पुरवठा दुरुस्ती, विंधन विहीरी दुरुस्ती करणे, विहिरीत गाळ उपसा दुरूस्ती, आदी विविध कामे करुन टँकरमुक्त करण्यावर भर दिला जाणार आहे. दरवर्षी मुबलक पाऊस पडूनही मार्च-एप्रिल महीन्यात पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यापेक्षा कायमस्वरूपी पाण्याची टंचाई कशी दुर होईल आणि गांवे टँकरमुक्त कशी होतील, यावरच आमदार किरण सामंत यानी अधिक भर दिला आहे. चार कोटी २५ लाख ८२ हजार रूपयांच्या संभाव्य पाण्याच्या आराखड्यात विहीर खोदण्यासाठी ५८लाख ८० हजारची ४९ कामे, विंधन विहीर दुरुस्तीची २ लाखाची ४ कामे, नळपाणी दुरूस्तीचे तथा तळी दुरूस्ती ३ कोटी ५१लाख ३ हजार रूपयांची ३४ कामे, विहीर गाळ व दुरुस्तीची ४ लाख रुपयांची ८ कामे, तसेच तात्पुरती पुरक नळपाणी योजनेसाठी १०लाख रूपयांची ८ कामे असुन एकूण ९६ कामांचा आराखड्यात समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आराखड्यात तालुक्यातील कोंडगे येथील धनगरवाडी, कोचरी येथील भोजवाडी ढोलमवाडी, धनगरवाडी, बेंद्रेवादडी, सुतारवाडी, प्रभानवल्ली येथिल गणेश खबरदारी, देवधे येथील धनगरवाडी, तेलीवाडी, आगवे येथील मोरेवाडी, आरगाव येथील कुणनेवाडी, कणगवली येथील तीखेवाडी, कोंडये येथील सोनारवाडी, कोट येथील मांडवकरवाडी, कोर्ले येथील सरकारवाडा, मुस्लिमगाव, कुरंग येथील पठारवाडी, कुर्णे येथील पड्यारवाडी, मानेवाडी व घडशीवाडी, खावडी येथील पीलके व गुरववाडी, गवाणे येथील चव्हाणवाडी, बौद्धवाडी, कर्नालावाडी, मावळवाडी, म्हेतरवाडी, गोवीळ येथील गोसावीवाडी, बौध्दवाडी, घावरेवाडी, गुरववाडी, गोळवशी येथील वीरवाडी, धामनवाडी, बौध्दवाडी, तेलीवाडी, जावडे येथील ब्राम्हणवाडी व गवाणकर, पालु येथील हुंबरवणेवाडी, पुनस येथील पूनसकोंड, बेनीबुद्रुक येथील चिंचवडे, लोहारवाडी, भडे येथील वरपाटवाडी, भांबेड येथील दत्तवाडी, कुडेवाडी, लक्ष्मीनगर, तेलीवाडी, गुरववाडी, नं.१ कुडेभवाडी, गांगणवाडी, पवारवाडी, बेर्डेवाडी, पेठदेव, वळणवाडी, धडमवाडी, गुरवाडी नं २ ,कोळेवाडी, धनगरवाडी, मठ येथील बेटकरवाडी, रिंगणे येथील गांगोवाडी, हांदेवाडी, रूण येथील धनगरवाडी, बौध्दवाडी, वाकेड विलवडे येथील सुतारवाडी, खामकरवाडी, वाडगाव येथील हसोल बौध्दवाडी, कोंडवाडी, वाघणगाव येथील डोंगरावरची, विवली येथील बौध्दवाडी, जठारवाडी, पवारवाडी, शिपोशी येथील बोरीवले, शिरवली येथील वरची शिरवली, सालपे येथील घागवाडी, बौध्दवाडी, केळवली, कोटकरवाडी, धनगरवाडी, हर्दखळे येथील धनगरवाडी, खोरनिनको येथील मुसळेवाडी, भट्टीचीवाडी, इसवली येथील सुतारवाडी, कुरचुंब येथील खालची गुरववाडी, सुवारेवाडी, तापेकरवाडी, गुरववाडी या वाड्यांचा समावेश आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg