loader
Breaking News
Breaking News
Foto

पडवे माजगाव ते कुंब्रल कोलझर, पणतुर्ली रस्ता पूर्ण करा, पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे उपोषण सुरू

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या दोन वर्षापासून कासवाच्या गतीने सुरू असलेल्या पडवे माजगाव ते कुंब्रल कोलझर पणतुर्ली रस्ता, पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी ठेकेदार लोकांची दिशाभूल करत आहेत. आंदोलन उपोषण इशारा दिला की तेवढे काम सुरू, पुन्हा बंद यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. जूना रस्ता उखडून टाकला आहे. मोऱ्या पूर्ण नाही यामुळे अनेक गावात एस टी बस जात नाही. विद्यार्थी ग्रामस्थ यांचे हाल होत आहेत. पण रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. यामुळे संतापलेल्या कुंब्रल पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी धनगरवाडी येथे बुधवारी उपोषणाला सुरूवात केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन २४ मध्ये पडवे माजगाव ते कुंब्रल कोलझर पणतुर्ली रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक मधून मंजूर झाला पण २०२६ सुरू झाले तरी तीस टक्के काम संबंधित ठेकेदार अधिकारी करू शकले नाही. ग्रामीण रस्ते विकास संस्था येथील कार्यालय मधिल अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात कामे रखडली आहेत.

टाइम्स स्पेशल

पडवे माजगाव ते कुंब्रल कोलझर पणतुर्ली रस्ता पूर्ण झाला नाही संथगतीने काम सुरू आहे. यामुळे हा रस्ता झाला पाहिजे यासाठी कुंब्रल पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी धनगरवाडी येथे बुधवारी सकाळी उपोषण सुरू केले आहे. यात सरपंच जनार्दन झोरे, विलास सावळ, अनिल सावंत, सुनील सावंत, विलास सावत, नाना जंगले, प्रकाश नाईक, प्रमोद सावंत जगदीश देसाई, नवसो कदम, दिवाकर सावंत, सागर सावंत, योगेश सावंत, इतर ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg