loader
Breaking News
Breaking News
Foto

भातगाव सुवरेवाडी येथे गणपती विसर्जन तलावाच्या कामास प्रारंभ

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील भातगाव येथील सुवरेवाडीमध्ये गणपती विसर्जनासाठी स्वतंत्र तलाव उभारण्याच्या कामास जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर यांच्या प्रयत्नातून सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षी गणेशोत्सव काळात विसर्जनासाठी योग्य सुविधा नसल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन महेश नाटेकर यांनी पुढाकार घेत हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या तलावामुळे पर्यावरणपूरक विसर्जनास चालना मिळणार असून पाण्याचे प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्रामस्थांना सुरक्षित आणि सोयीस्कर विसर्जनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. मतदानाआधी दिलेले आश्वासन पूर्ण करून कामाची सुरुवात झाल्याने सुवरे वाडीतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg