सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बागायतदारांना तातडीने जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. आमदार दीपक केसरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, आंबा आणि काजू ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य पिके असून ती शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, लांबलेला पाऊस आणि तापमानातील सततच्या बदलांमुळे हा मोहोर काळा पडला. यामुळे फळधारणा होऊ शकली नाही, परिणामी हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे.
जिल्ह्यात वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे उरल्यासुरल्या पिकांचेही नुकसान झाले. शेतकऱ्यांनी बागांच्या मशागतीसाठी, खते आणि कीटकनाशकांसाठी सहकारी सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून मोठी कर्जे घेतली आहेत.उत्पन्न बुडाल्याने आता हे कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न बागायतदारांसमोर उभा ठाकला आहे, या पत्रात त्यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्गातील फळ बागायतदार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्यांना प्रशासकीय पातळीवर तातडीने मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार केसरकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.