loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात फार्महाउस चोरी आणि बस स्थानकावरील दागिने चोरीची उकल

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे फार्महाउस येथे झालेल्या घरफोडीतील आरोपीने मोबाईल आणि सोन्याची चैन घेऊन पोबारा केला होता. सदरचा गुन्हा मुरबाड पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी दाखल झाला. स्थानिक गुन्हे शाखेने संशयीत क्रिश जितेश संघवी याला अटक करून त्याच्याकडून २२ ग्राम वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यात पोलिसांना यश लाभले. तसेच २१ डिसेंबर, २०२४ रोजी मुरबाड स्थानकावरील दागिने चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ९ तोळ्यांच्या दागिन्यांसह महिला संशयीत आरोपी लक्ष्मी जाधव याना अटक केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारदार सारीखा संजय घुडे या २१ डिसेंबर २०२४ रोजी मुरबाड बसस्टँडवरून आपल्या मूळगावी उंबरपाडा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत होत्या. सायंकाळी सुमारे ५.३० वाजता सरळगावकडे जाणारी बस लागल्यानंतर गर्दीत बसमध्ये चढताना अनोळखी चोरट्याने त्यांच्या पर्सची चैन उघडून पर्समधील सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालमत्तेविषयक गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करून कोणताही ठोस धागादोरा नसताना गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे लक्ष्मी जाधव या महिलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्या महिलेने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीस गेलेले ९ तोळे १.५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

तसेच दुसऱ्या चोरीच्या घटनेत रविंद्र दत्तु जोशी (वय ६२) हे मुरबाड तालुक्यातील, तुळई-बादनपाडा येथे त्यांच्या फार्महाऊस मध्ये १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दिवसभर फार्महाऊसची साफसफाई केल्यानंतर रात्री सुमारे १० वाजता मोबाईल चार्जिंगला लावून गळ्यातील सोन्याची चेन कपाटात ठेवून झोप घेतली होती. मात्र रात्रीच्या वेळी अनोळखी चोरट्याने फार्महाऊसमध्ये प्रवेश करून मोबाईल व सोन्याची चेन चोरी केली. याप्रकरणी २० फेब्रुवारी २०२६ रोजी मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयीत क्रिश जितेश संघवी (रा. नवपाडा, डोंबिवली पूर्व) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली २२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg