loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात १ हजार ३५० चालकांनी घेतले सभासदत्व

ठाणे (अमोल पवार) - धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या सभासद नोंदणीला चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल १ हजार ३५० रिक्षा-टॅक्सी चालकांनी सभासदत्व स्वीकारले आहे. संघटित शक्तीच्या माध्यमातून आपले हक्क आणि सन्मान अबाधित राखण्यासाठी चालकांनी पुढाकार घेतल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार मंडळाच्या सभासदांचे अधिकृत ओळखपत्र तयार करण्यात आले असून, मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथे ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. या वेळी चालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांगीनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची सभासद नोंदणी ३ जुलै २०२५ पासून सुरू करण्यात आली होती. सभासद होण्यासाठी रुपये ८००/- नोंदणी व सभासद शुल्क निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत शुल्क भरून सभासद झालेल्या चालकांचे ओळखपत्र तयार करण्यात आले असून, उर्वरित ओळखपत्रे संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार आहेत. सभासदांनी आपापल्या कार्यालयातून ओळखपत्र स्वीकारावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

जे रिक्षा-टॅक्सी चालक अद्याप मंडळाचे सभासद झालेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून सभासदत्व घ्यावे, असे आवाहन मंडळाने केले आह. रिक्षा-टॅक्सी चालकांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू झालेला हा उपक्रम चालकांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg