दोडामार्ग (प्रतिनिधी) - कसर्ई दोडामार्ग गावच्या विकासासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी त्याच बरोबर शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अर्थसंकल्प विशेष सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सन २०२६/२०२७ आर्थिक वर्षासाठीचा शिलकी रकमेचे अंदाजपत्रक सभागृहात सादर केले, या अंदाजपत्रकास सर्वानुमते संमती देण्यात आली. बुधवार दिनांक २५/०२/२०२६ रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी संकेत गायकवाड तसेच विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल आनंद परब यांनी केले.
या अर्थसंकल्पात आगामी वर्षी होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी विशेष तरतूद करण्यात आली, तसेच स्वच्छता, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, दिव्यांग, मागासवर्गीय, जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. तसेच शहरातील नागरीकांसाठी विशेष पाणीपुरवठा योजनेसाठी तरतूद करण्यात आली असून आगामी वर्षात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले. याचसोबत सौरऊर्जा प्रकल्प, सक्शन वाहन, नाट्यगृह बांधकाम, नमो उद्यान, विद्युत वाहनासाठी चार्जिंग स्टेशन व घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञान असलेल्या मशीन खरेदीसाठीही तरतूद करण्यात आली आहे. बुधवारी पार पडलेल्या या विशेष सभेत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी. तसेच विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी सही करून निघून गेले. तर काही नगरसेवक गैरहजर होते.
नगरसेविका, सभापती, संध्या प्रसादी,नितीन मणेरीकर, गौरी पार्सेकर, संजना म्हावळणकर, स्वराली गवस, समीर रेडकर, ज्योती जाधव, क्रांती जाधव, रामचंद्र मणेरीकर, वासंती मयेकर उपस्थित होते. कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत अस्तित्वात आली तेव्हा बजेट कमी होते. आज मोठया प्रमाणात तरतूद केली आहे. कसर्ई दोडामार्ग शहरात नवीन विकास कामाना चालना मिळणार आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.