रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हिरक महोत्सवी, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे 27 वे आणि रत्नागिरी ग्रंथालय संघाचे 49 वे वार्षिक अधिवेशन दिनांक 21 व 22 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ आणि स्व. आमदार कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी मंगल कार्यालय शांतीनगर - नाचणे, तालुका - जिल्हा रत्नागिरी येथे मोठ्या दिमाखात पार पडले. या तिहेरी अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. याआधी पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8.30 वा. साई मंदिर ते अधिवेशन स्थळ दरम्यान ढोल ताशांच्या गजरात आणि ग्रंथालय चळवळीच्या जय घोषात प्रचंड उत्साहात ग्रंथदिंडीने या अधिवेशनाची सुरुवात झाली.
यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष, आमदार गंगाधर पटने आणि ज्ञात - अज्ञातांना श्रद्धांजली अर्पण करुन सकाळी 11 वा. राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्या शुभहस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष - मा. मरिनर दिलीप भाटकर (संपादक कोकणशिल्प) यांनी सर्वांचे स्वागत केले. साहित्यिक कृष्णाजी कुलकर्णी व संतसाहित्य आणि ग्रंथालय चळवळीचे अभ्यासक धनंजय चितळे यांचे यानिमित्ताने उद्घाटन समारंभात मार्गदर्शन लाभले.
यावेळी राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, कोकण विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, कार्य उपाध्यक्ष ग्रंथमित्र राम मेकले, कोषाध्यक्ष भीमराव पाटील, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, ग्रंथालय कर्मचारी प्रतिनिधी ग्रंथमित्र नंदू बनसोड यांची मंचावर उपस्थिती लाभली. या उद्घाटन समारंभामध्ये प्रास्ताविक रवींद्रकुमार तथा भाई कालेकर यांनी तर सूत्रसंचालन अंजली बर्वे यांनी केले.












































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.