loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त सामूहिक गीत गायन उत्साहात

खेड (प्रतिनिधी) - शिखांचे नववे गुरु तेज बहादूर सिंग यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त कोकण विभागात आयोजित सामूहिक गीतगायन उपक्रमात रोटरी विद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळी 9.00 वाजता शाळेच्या सभागृहात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी “हिंद दी चादर” या प्रेरणादायी गीताचे सामूहिक गायन केले. संपूर्ण परिसर देशभक्ती आणि एकात्मतेच्या भावनेने दुमदुमून गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेची मूल्ये जोपासण्याचे आवाहन केले. शिक्षकांनीही गुरुजींच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. सामूहिक गायनानंतर गुरुजींच्या जीवनावर आधारित घेण्यात आलेल्या ऐच्छिक स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण करून संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले.

टाइम्स स्पेशल

कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरी विद्यालयाने हा ऐतिहासिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि धर्मनिरपेक्षतेची जाणीव अधिक दृढ झाली. यावेळी उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, प्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी निवाते यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg