loader
Breaking News
Breaking News
Foto

निगडे बोरज शाळेत ‘माझा शाश्वत कोपरा’ चित्रकला स्पर्धा उत्साहात

खेड : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र आणि डाऊ केमिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझा शाश्वत कोपरा’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा निगडे बोरज क्रमांक २ येथे चित्रकला स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या कल्पकतेचे सुंदर चित्रांद्वारे सादरीकरण केले. स्पर्धेत विद्यार्थ्यांना वयोगटानुसार विभागण्यात आले होते. इयत्ता १ ते ५ वयोगटात श्रिया आदावडे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर मधुरा शिगवण हिने द्वितीय आणि आराध्या मोरे हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच इयत्ता ६ ते ७ वयोगटात तनवी कांबळे हिने प्रथम क्रमांक मिळवला असून, यश चीनकटे द्वितीय आणि रुणाल मोरे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या गौरवामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला असून त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले. या प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र बेलोसे, शिक्षिका स्वाती राठोड, कासार आणि कासार यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. या उपक्रमामागील प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या सृजनशीलतेला चालना देणे हा होता. विद्यार्थ्यांनी निसर्ग, पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयांवर आधारित आकर्षक चित्रे सादर करून आपली कल्पकता दाखवली. पालकांनी आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कलेला योग्य दिशा आणि प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg