loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात हुंडाबळी प्रथेविरोधात जनजागृती कार्यक्रम

मालवण (प्रतिनिधी) - जिल्हा महिला बालविकास कार्यालय अंतर्गत अभय केंद्र मालवण सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हुंडाबळी एक अनिष्ट प्रथा या विरोधात कै. गंगुबाई कृष्णराव सिताराम देसाई सभागृह, मालवण येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात बालविकास प्रकल्प अधिकारी उल्का खोत, अभय केंद्र मालवणचे संरक्षण अधिकारी गौरव एखंडे, तसेच वन स्टॉप सेंटरच्या ॲड. मीनाक्षी नाईक, ॲड. नंदिनी मोडकर, निकिता पाटकर, प्राध्यापक दत्ताराम माळी व इतर शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्ताविक गौरव एखंडे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ऍड. मीनाक्षी नाईक यांनी हुंडा प्रतिबंध कायदा १९६१ व पोक्सो ऍक्ट संदर्भात मुलांशी व महिलांची संवाद साधला. त्याचप्रमाणे नंदिनी मोंडकर यांनी मुलांना मोबाईलचे दुष्परिणाम व त्यामुळे वाढती गुन्हेगारी याबाबत मार्गदर्शन केले. मेघा वजराटकर यांनी महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांनी विधी सेवा समिती अंतर्गत येणाऱ्या योजनांबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमात शंभर विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण साबळे यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg