loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जनतेची कामे करावीत - तहसीलदार गणेश लव्हे

मालवण (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्या प्रश्नांची सोडवणूक केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गुणांचा आदर्श घेऊन आपण महसूल विभागामार्फत जनतेची कामे करावी, असे प्रतिपादन तहसीलदार गणेश लव्हे यांनी तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी डी.एड. कॉलेज मालवणच्या प्रा. आनंदी घोगळे, बार्टीचे मालवण समतादूत संग्राम कासले, दिप घोगळे, तसेच महसूलचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. आनंदी घोगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली तर बार्टीचे समतादूत संग्राम कासले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सागरी आरमार याबाबत विवेचन केले याप्रसंगी दीप घोगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg