loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात शिवजयंती निमित्त दिव्यांग आनंद मेळावा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने शिवजयंती निमित्त दिव्यांग आनंद मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती संस्था, कसाल चे ३० तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ, महाराष्ट्र कोकण विभाग ची शाखा सावंतवाडी व गोवा विभागीय ३५ दिव्यांग या आनंद मेळाव्यात सहभागी झाले होते. या मेळाव्याचा शुभारंभ सेवांगणचे कार्याध्यक्ष शैलेश खांडाळेकर, अनिल शिंगाडे, बाबुराव गावडे, संदिप तांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व जीवन यावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. त्यामध्ये कमलाकांत शिरोडकर यांनी प्रथम क्रमांक, दूर्वा निर्गुण यांनी द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक ललित गावडे यांनी पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर बास्केटमध्ये बॉल टाकण्याची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये रिया मुंबरकर यांनी प्रथम क्रमांक, रंजना इंदुलकर यांनी द्वितीय क्रमांक आणि अनिल शिंगाडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेनंतर सर्वांनी मिळून भोजन केले. दुपारच्या सत्रात गीत गायन स्पर्धा कोकण क्रांती ग्रुप आणि दिव्यांग भरारी ग्रुप अशा दोन ग्रुप मध्ये घेण्यात आली. यामध्ये दिव्यांग भरारी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. यांच्या ग्रुप इन्चार्ज मेघना नाईक होत्या. तसेच द्वितीय क्रमांक कोकण क्रांती ग्रुपचे लीडर गणेश शिरसाट यांनी प्राप्त केला. त्यानंतर संगीत खुर्ची स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटात घेण्यात आली. यामध्ये महिला गटात जयश्री मेजरे तसेच पुरुष गटामध्ये संदीप माळवदे यांनी बक्षीस पटकावले. सर्व विजेत्यांना बक्षीसे वितरीत करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

त्यानंतर सर्व दिव्यांग मंडळीनी सेवांगण कर्मचाऱ्यांच्या सोबत राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला भेट दिली. समुद्रकिनाऱ्याने चालत प्रथम राजकोट त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याचे दर्शन आणि त्यानंतर रॉक गार्डन व चिवला किनारा असा प्रवास करत परत पुन्हा सेवांगणमध्ये दाखल झाले. तर सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यावेळी करून शिवरायांच्या कार्याची माहिती जीवन प्रेरणा संस्थेचे व्यवस्थापक संजय आचरेकर यांनी दिली. तसेच शिंगाडे, बाबुराव गावडे तसेच अन्य दिव्यांग सहभागी शिवप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg