loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत १० हजारांची लाच घेताना तलाठी महिलेला रंगेहात पकडले

दापोली (वार्ताहर): दापोली तालुक्यातील नानटे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) यांना आज दुपारी दापोली तहसीलदार कार्यालयाच्या एका सभागृहात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदाराने मौजे तेरेवायंगणी येथील गट नं. ३११ मधील ७८ गुंठे जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या ७/१२ उतार्‍यावर नाव नोंद करण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात संपर्क साधला होता. यावेळी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बंडे यांनी फेरफार नोंद करून उतारा देण्यासाठी त्यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती, तक्रारदार याने २४ फेब्रुवारी रोजी तलाठी बंडे यांची पुन्हा भेट घेऊन तक्रारदाराने खरेदी खताची नोंद मंजूर करून फेरफार व सात बाराचा उतारा मागितला असता त्यासाठी तलाठी बंडे यांनी तक्रारदार यांचेकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे तक्रार दिल्यानंतर आज २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सापळा कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित तलाठी यांनी लाचेची रक्कम पंचासमक्ष रक्कम स्वीकारली. त्यानंतर त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, निरीक्षक मच्छिन्द्र जाधव, सुहास रोकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास चांदणे, हवालदार श्रेया विचारे, दीपक आंबेकर, राजेश गावकर, समिता क्षीरसागर सहभागी झाले होते. दापोलीच्या तहसीलदार कार्यालयातील एका सभागृहात भर दुपारी या महिला तलाठी यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने दापोलीत खळबळ उडाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg