अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्याचा विडा शिवसेना नेते तथा कॅबिनेट भरत गोगावले यांनी उचलला असतानाच खा. सुनील तटकरे यांनी डाव टाकला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सत्ता द्यायची नाही म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाबरोबर एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. असे झाले तर भरत गोगावले यांना हा मोठा धक्का असेल. दरम्यान, संकटमोचक म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रायगडात ठाण मांडून बसले असून, ते काय जादू करणार यावरच रायगडमध्ये सत्ता कोणाची याचा फैसला होणार आहे. तटकरे हे उदय सामंत यांचे गुरु समान आहेत. आता गुरु शिष्याचे ऐकतात का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीने रायगडमध्ये एकत्रित निवडणुका लढवल्या. निवडणुकीत ५९ जागांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसने १६ जागा तर भाजपने १५ जागा जिंकल्या. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने सर्वाधिक २१ जागा जिंकल्या. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी ९ जागांची गरज आहे. हेच लक्षात घेऊन आपापले जिल्हा परिषद सदस्य भाजप-राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी हलवले. शिवसेनेकडून उदय सामंत यांनी रायगड जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसविण्यासाठी प्रयत्न केले खरे पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. तटकरे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेची समीकरणे आणि वाटाघाटीवर यशस्वी चर्चा झाल्याची माहिती आहे. सर्वाधिक जागा जिंकणार्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आखली. भाजप राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदेसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडे अध्यक्षपद जाणार आहे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे उपाध्यक्षपद देण्याचे दोन्ही पक्षांमध्ये ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित सत्ता वाटपाची समीकरणे पुढच्या काही दिवसांत ठरतील, असेही सूत्रांनी सांगितले.
रायगड जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत आता वेग आला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि भाजप नेते आस्वाद पाटील यांनी अलिबाग येथील एका कार्यक्रमात मोठ विधान केले आहे. ज्या प्रमाणे रायगड जिल्हा परिषदेवर भाजपाचा अध्यक्ष बसला, त्याप्रमाणे विधानसभेवर सुद्धा येणार्या काळात आपला आमदार असेल असे विधान करत शिंदे शिवसेनेला आव्हान दिले. भाजप राष्ट्रवादीच्या या खेळीवर शिंदे शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. किती दिवस आपण दुसर्यांबरोबर चालणार आणि मार्केटिंग करणार असे म्हणत येणार्या काळात आपली मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढली पाहिजे, असे आस्वाद पाटील म्हणाले. रायगडसारख्या मोठ्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेची सत्ता हवी म्हणून एकनाथ शिंदे आग्रही आहेत. भरतशेठ गोगावले यांनीही विडा उचलला आहे. आता सुनील तटकरे यांनी डाव टाकल्याने शिंदेसेनेची गोची झाली आहे. त्यासाठीच शिंदेंचे संकटमोचक समजले जाणार ना. उदय सामंत यशस्वी शिष्टाई करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. उदय सामंत हे खा. सुनील तटकरे यांची करंगळी धरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आले. त्यांच्या राजकीय जडणघडणीत तटकरेंचा सिंहाचा वाटा आहे. एका अर्थाने तटकरे हे उदय सामंत यांचे राजकीय गुरुच आहेत, असे बोलले जाते. आता या दोन नेत्यात काय समजोता होतो याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे.















































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.