loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत वराडकर हायस्कुल कट्टाचे नेत्रदीपक यश!

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत (NMMS) कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत कुमारी. समीक्षा सुनील गावडे, कुमारी जान्हवी बापू भोसले, कुमारी तन्वी प्रमोद चव्हाण, वरद अजित नाईक, हेमंत शशिकांत तीळवे, देवांग नितीन नांदोसकर, कुमारी चंदना बाळकृष्ण शेटे, निखिलेश रवींद्र मेस्त्री, कुमारी अक्षरा एकनाथ शेरे, सुयश संदीप कदम या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड. एस. एस. पवार, कर्नल शिवानंद वराडकर अध्यक्ष अजयराज वराडकर उपाध्यक्ष, आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक श्रीमती विजयश्री देसाई सहसचिव श्री. एस. डी. गावडे, खजिनदार रवींद्र पावसकर शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे पर्यवेक्षक व स्पर्धा प्रमुख महेश भाट आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg