loader
Breaking News
Breaking News
Foto

लाच घेताना रंगेहात पकडलेल्या अधिकार्‍याच्या घरात धाडीत सापडली तब्बल ४ कोटींची रोकड

भुवनेश्वर : ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या अधिकार्‍याच्या घरातून तब्बल ४ कोटी रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त झाल्याने तपास यंत्रणाही चकित झाले आहेत. नोटांचे इतके बंडल होते की मोजणीसाठी मशीनही अपुरी पडल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रोकड जप्ती असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई ओडिशा राज्यातील खाण विभागातील उपसंचालक देबब्रत मोहंती यांच्यावर करण्यात आली. त्यांना लाच घेताना दक्षता पथकाने अटक केली. एका परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडून काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी ३० हजार रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी रात्री अटकेनंतर एसीबीने एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकले. भुवनेश्वर येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये, भद्रक जिल्हा येथील मूळ गावी असलेल्या घरात आणि कटक येथील कार्यालयात तपास करण्यात आला. या धाडीत सर्वात मोठा धक्का भुवनेश्वरमधील फ्लॅटमध्ये बसला. फ्लॅटमध्ये ट्रॉली बॅगमध्ये कोंबून ठेवलेले नोटांचे बंडल सापडले. अधिकार्‍यांनी मोजणी केली असता एकूण रक्कम ४ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय त्यांच्या कार्यालयातील ड्रॉवरमधून १ लाख २० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

तपासादरम्यान भुवनेश्वरमध्ये असलेले आलिशान दोन मजली घर आणि सुमारे १३० ग्रॅम सोनेही सापडल्याची माहिती देण्यात आली. राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रोकड जप्ती असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. केवळ ३० हजार रुपयांच्या लाचेपासून सुरू झालेल्या या कारवाईत कोट्यवधींचा साठा उघड झाल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg