मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात बारामतीचा गड कोण लढवणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं गेलं असून त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. १० मार्चला प्रसिद्ध होणार्या मतदार यादीनंतर निवडणुकीची अधिकृत घोषणा होणार असली तरी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीने आतापासूनच प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. अजित पवार यांचा विकासकामांचा वारसा आणि पवारांचा बालेकिल्ला राखण्याचं मोठं आव्हान आता सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर असणार आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. त्यांच्या पश्चात बारामतीचा गड कोण सांभाळणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बारामतीमधील राजकीय वारसा आणि अजित पवारांनी केलेली विकासकामे पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर पक्षाच्या सर्व नेत्यांनी बहुमताने शिक्कामोर्तब केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी १० मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी या पोटनिवडणुकीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या उत्तरार्धात बारामतीमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजू शकते. एकीकडे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली असली, तरी दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रात एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची राजकीय परंपरा राहिली आहे. अजित पवार यांचे राज्याच्या राजकारणातील योगदान आणि त्यांचे सर्वपक्षीय संबंध लक्षात घेता त्यांच्या सन्मानार्थ इतर राजकीय पक्षांनी उमेदवार उभा करू नये, अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केली जाण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून बारामतीचा दौरा केला आहे. मात्र, आता विधानसभेच्या रिंगणात उतरून अजित पवारांचा बालेकिल्ला राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. मतदारसंघातील विकासकामे, कार्यकर्त्यांचे जाळे आणि अजित पवारांबद्दल असलेली सहानुभूती या जोरावर सुनेत्रा पवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. आता सर्व लक्ष १० मार्चकडे लागले आहे. राज्य निवडणूक आयोग तारखांची घोषणा कधी करते आणि विरोधी पक्ष या निवडणुकीत काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.