loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रासोल कंपनीचा सामाजिक उपक्रम

खोपोली - प्रासोल केमिकल लिमिटेड कंपनीने सामाजिक बांधिलकीमधून खोपोली येथील कुंदा दोंदे चॅरिटेबल संस्थेमधील दिव्यांग मुलांना कौशल्य विकास, रोजगार प्रशिक्षण, आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक ती मदत म्हणून अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवला तसेच त्यांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठेत विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन दिली. प्रासोल केमिकल लिमिटेड कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आजूबाजूच्या गावातील महिलांचे सक्षमीकरण व बळकटीकरण करुन त्यांना गृह उद्योगांमध्ये प्रोत्साहन दिले. या अंतर्गत उत्पादनांसाठी स्टॉल, शॉपिंग मॉल तसेच लहान मुलांसाठी विविध खेळ अशा गोष्टींचा समावेश असलेली बाजारपेठ मिळून दिली. या कार्यक्रमासाठी प्रासोल कंपनीचे साईट हेड विलास पाटील, एचआर हेड शोभा शेट्टेन, संदीप खोपकर, योगेश पाटील, सुप्रिया पाटील तसेच ग्रुप ग्रामपंचायत होनाड सरपंच प्रकाश पाटील तसेच ग्रुप ग्रामपंचायत साजगाव सरपंच, तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्या रेश्मा पाटील आणि खालापूर बचत गटाच्या अधिकारी, तसेच ग्रुप ग्रामपंचायतच्या महिला सदस्य देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg