loader
Breaking News
Breaking News
Foto

वर्दीतली माणुसकी... रस्त्यावरच्या वृद्धाला दाखवली घराची वाट

सावंतवाडी : सावंतवाडी बाजारपेठ आरपीडी रोड येथील साई मंदिर परिसरात एक वयस्कर व्यक्ती गेले दोन दिवस रस्त्या शेजारी पडलेल्या स्थितीत आढळून आली. वय झाल्यान त्यांना नीट बोलण्यास येत नव्हते. त्यांच्या आधार कार्डवरून त्यांचे नाव व पत्ता समजला असता याबाबत सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ त्या ज्येष्ठाला सही सलामत त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तुकाराम कृष्णा म्हापणकर (वय ७०) असे त्या वृद्धाचे नाव असून त्यांना घावनळे खुटवळवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी जात पोलीस पाटील तोरसकर यांच्या समक्ष म्हापणकर यांचा पुतण्या राजन म्हापणकर यांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महेश जाधव व भूषण भोवर यांनी ही सामाजिक बांधिलकी जपली. पोलिसांच्या या तत्परतेच समाजातून कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg