loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईत आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक; राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज होणाऱ्या या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांसह वर्किंग कमिटी सदस्य, विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेची अधिकृत पूर्तता याच बैठकीत केली जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडणार आहेत. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेते या प्रस्तावाला अनुमोदन देणार असून सर्वानुमते निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पक्षातील नेत्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वात होणारा हा बदल आगामी राजकीय रणनीती आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे पक्षात नव्या नेतृत्वाला संधी मिळणार असून राज्यासह राष्ट्रीय स्तरावर पक्षाची भूमिका अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg