loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले येथे स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा

दापोली - स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे स्वामींच्या पालखी पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील बहुसंख्य स्वामीभक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आंजर्ले येथील स्वामीभक्त नंदाताई माळवे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पादुका दर्शनाचा सोहळा आंजर्ले रविंद्र अनंत तोडणकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात येतो. आंजर्ले भंडारवाडा येथील रविंद्र अनंत तोडणकर यांच्या निवासस्थानी दि. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा साजरा होत आहे. यावेळी स्वामी समर्थ पादुका मिरवणूक व सामुहिक आरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील स्वामीभक्तांनी या दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक तथा स्वामीभक्त नंदाताई माळवे यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg