रत्नागिरी : मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. एकूण २५९.५१३ किलोमीटर लांबीच्या अंतरापैकी तब्बल २४९.७३२ किलोमीटरचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजे ९६.२३ टक्के काम पूर्ण झाले असून आता केवळ ९.७८१ किलोमीटरचे काम शिल्लक राहिले आहे. सर्वात जास्त काम आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकड या भागात शिल्लक आहे. विशेषतः परशुराम घाट ते झाराप या पट्ट्यातील बहुतांश काम पूर्ण झाले असून प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही माहिती दिली.
या महामार्गाच्या विविध टप्प्यांचा वेगवेगळ्या पॅकेजचा विचार केल्यास, तळेगाव ते काळमठ आणि झाराप ते पत्रादेवी या भागातील काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. काळमठ ते झाराप आणि वाकड ते तळेगाव या दरम्यानचे कामही ९९.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून येथे केवळ नाममात्र काम बाकी आहे. परशुराम घाट ते आरवली दरम्यान ३४.४५ किलोमीटरपैकी ३२.११ किलोमीटरचे रस्ते तयार झाले असून येथे ९७.४० टक्के प्रगती झाली आहे.
सर्वात जास्त काम आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकड या भागात शिल्लक आहे. आरवली ते कांटे दरम्यान ८५.०५ टक्के काम झाले असून तिथे अजूनही सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता तयार होणे बाकी आहे. तसेच कांटे ते वाकड या ४९.१५ किलोमीटरच्या टप्प्यात ९१.१८८ टक्के काम पूर्ण झाले असून तिथे ५ किलोमीटरच्या आसपास कामाची प्रतीक्षा आहे. एकूणच आकडेवारी पाहता, महामार्गाचा हा मोठा हिस्सा आता वाहतुकीसाठी सज्ज होत आला असून कोकणवासीयांचा प्रवास वेगवान होणार आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.