loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामसेवकावर धक्काबुक्की करून हल्ला प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

खेड (प्रतिनिधी) - भिलारे आयनी, तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथील ग्रामसेवक राहुल राजेंद्र चौधरी यांनी खेड पोलिसांकडे फिर्याद देऊन कळवले की तारीख ४ फेब्रुवारी २०२४ रोजी २ वाजता भिलारे आयनी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय ग्रामसभेत संशयीत आरोपी नामे सुनील कुमार राजाराम शिंदे व राजेंद्र यशवंत भिलारे यांनी संगनमत करून उपस्थित ग्रामसभेत फिर्यादीशी वाद करून त्याच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की करून साधी दुखापत करून त्यांना शासकीय काम करत असताना अडथळा केला म्हणून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३३२ ३५२ ३५३ ३२३ ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कामी पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारूक पत्र दाखल केले. आरोपीतर्फे ऍडव्होकेट सुधीर शरद बुटाला यांनी काम पाहिले. या कामे एडवोकेट सुधीर बुटाला यांनी साक्षीदार यांचा उलट तपास घेतला. त्या कामी झालेला उलट तपास व एडवोकेट बुटाला यांनी तपासात दाखवलेली त्रुटी व युक्तिवादाचा विचार करून मेहरबान जिल्हा न्यायाधीश (अतिरिक्त) यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg