loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतल्या चार रस्त्यांची उच्चस्तरीय पाहणी

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात एशियन डेव्हलपमेंट बँक च्या अर्थसहाय्याने सुमारे ३०० कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या चार महत्त्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण होऊन तीन वर्षे उलटल्यानंतर उच्चस्तरीय पाहणी दौरा पार पडला. यामध्ये चाफे ते गणपतीपुळे, हातिवले ते जैतापूर, दाभोळ ते वाटूळे आणि देवरुख ते तुरळ या रस्त्यांचा समावेश आहे. या पाहणीचा मुख्य उद्देश म्हणजे या प्रकल्पांमुळे जिल्ह्याला प्रत्यक्ष आर्थिक व सामाजिक फायदा झाला का, याचा सखोल आढावा घेणे हा होता. या दौर्‍यात मीनाक्षी शर्मा, शिवा दाडेला, अनिता कुमारी, मारिया लहुरीन, मारिया एरिस मर्डनिया व डिकवाला सहभागी होते. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपअभियंता भारती जनक धोत्रेकर तसेच संबंधित शाखा अभियंते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे चारही रस्ते कोकणातील किनारी, डोंगराळ व ग्रामीण भागांना पर्यटन, औद्योगिक आणि बाजारपेठांशी जोडणारे महत्त्वाचे संपर्कमार्ग आहेत. स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी सांगितले की, पूर्वी डोंगराळ रस्त्यांमुळे होणारा विलंब आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. अधिकाऱ्यांनी रस्त्यांची जाडी, डांबरीकरण, साईड ड्रेनेज, रिटेनिंग वॉल आणि सुरक्षा उपाययोजनांची तपासणी केली. काही ठिकाणी किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे निदर्शनास आले असून संबंधितांना तातडीचे निर्देश देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या पाहणीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. आवश्यक ते सुधारात्मक उपाय सुचवले जाणार असून भविष्यातील प्रकल्पांसाठी हा अहवाल मार्गदर्शक ठरणार आहे. तीन वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या या चार रस्त्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्याची संपर्क व्यवस्था अधिक सक्षम झाली असून आर्थिक हालचालींना चालना मिळाल्याचे प्राथमिक निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg