loader
Breaking News
Breaking News
Foto

धोकवडे येथे शेतातून कलिंगडाची चोरी, तक्रार दाखल

अलिबाग (वार्ताहर) - एकीकडे भातशेती करणे कठीण झाले असल्याने शेतकरी पर्याय म्हणुन अन्य पिकांचा प्रयोग आपल्या शेतात करू पहात आहे. पण त्या पिकाकडे देखील काहींची वक्रदृष्टी पडत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहे. अलिबाग तालुक्यातील धोकवडे (१) येथे एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल 80 कलिंगड चोरीस गेल्याची तक्रार संबंधीत शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संजय मधुकर म्हात्रे असे शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील धोकवडे नंबर 1 येथे त्यांची शेती आहे. गेली चार वर्षे ते उन्हाळ्यात कलिंगड लागवड करतात. भात शेतीला पर्याय म्हणुन त्यांनी कलिंगड लागवड केली. डिसेंबर, जानेवारी या दोन महिन्यात कलिंगड तयार होऊन बाजारात विक्रीस नेले जाते. संजय म्हात्रे यांच्या शेतातून 24 फेब्रुवारी रोजी रात्री कलिंगडाची चोरी करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे त्यांच्या शेताच्या परिसरात ग्रामपंचायतीने बसविलेले सी सी टीव्ही आहेत. पण ते बंद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान संजय म्हात्रे यांनी कलिंगड चोरीची तक्रार मांडवा सागरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या चोरी मुळे म्हात्रे यांचे 4000 हजाराचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg