दोडामार्ग (प्रतिनिधी) - येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात श्री सिद्धिविनायक बुक बँक योजनेंतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी मुंबई मार्फत महाविद्यालयास एकूण ४९५ इतकी पुस्तके प्राप्त झाली असून बहुसंख्य विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनात मराठी साहित्य, चरित्र ग्रंथ, विश्वकोश, कथा संग्रह, काव्य संग्रह, तसेच निवडक साहित्यिकांची पुस्तके मांडण्यात आली होती. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन गोगटे वाळके महाविद्यालय, बांदा येथील मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. कार्वेकर यांनी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज असून आपण प्रत्येकाने आठवड्यामध्ये किमान एका पुस्तकाचे वाचन केले पाहिजे असे, आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी आपल्या मनोगतात ग्रंथालयातील उपलब्ध असलेले मासिके, साप्ताहिके, वर्तमानपत्रे वाचली पाहिजे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन ग्रंथपाल डॉ. रामकिसन मोरे, व कल्पेश गवस यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. डी. वाय. बर्वे, प्रा. डॉ. एस. यु. दरेकर, प्रा. डॉ. पी. एन. ढेपे, प्रा. रोहन बागकर, प्रा. प्रथमेश ठाकूर, प्रा. दर्शनी कोटकर, प्रा. शेफाली गवस, इतर सर्व प्राध्यापक, कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.