loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामिण भागात पर्यटनाला अनेक संधी-राज्यमंत्री योगेश कदम

रत्नागिरी - रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या अपार संधी आहेत. या भागात देश विदेशातील पर्यटक येत असतात. त्यामुळे कोकणातल्या ग्रामिण भागात पर्यटन विकासाला अनेक संधी आहेत असे मत राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत दापोली तालुक्यात पर्यटक सुविधांची कामे सुरू आहेत. या पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत दर्जेदार स्वरूपाची कामे करून पर्यटकांसाठी उत्तम सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित कोकण पर्यटन ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीस मंत्रालयात ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे, चिपळुण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हर्षल चव्हाण उपस्थित होते, तर दुरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी बेठकीत सहभाग घेतला. कामांचा आढावा घेत असताना राज्यमंत्री कदम म्हणाले, गावातील बचत गटांचा कोकण पर्यटन ग्रामीण विकास कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यात यावा. बचत गटाच्या सूचनांचाही अंतर्भाव करण्यात यावा. कर्दे ग्रामपंचायत हद्दीतील प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे पूर्ण करावी.

टाइम्स स्पेशल

कर्दे खाडीवर पूल बांधणे, खाडी येथे संरक्षक बंधारा बांधणे तसेच कर्दे येथे समुद्र किनार्‍यालगत सांस्कृतिक संकुल बांधकाम या कामांसाठी सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) ची परवानगी मिळण्याची कार्यवाही पूर्ण करावी. कर्दे परीसरात पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करावी, असेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी सूचीत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg