loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालूका संजय गांधी निराधार योजना शासकीय समितीच्या अध्यक्षपदी भगवान घाडगे

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुका संजय गांधी निराधार योजना शासकीय समितीच्या अध्यक्षपदी तालुक्यातील भोमडी गावचे रहिवासी भगवान शंकर घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना समितीच्या शुक्रवारी झालेल्या त्यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्याच बैठकीत तब्बल ७५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. रंजल्या गांजलेल्या परित्यक्ता निराधारांसह पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे न्याय देण्याचे महत्त्वाचे काम समितीने केले आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील आदेश क्रमांक/संगायो/तालुका. स्त. समिती/२०२६ दिनांक ०९/०१/२०२६ अन्वये दापोली तालुक्याकरिता संजय गांधी निराधार योजना समिती स्थापन करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भगवान शंकर घाडगे यांच्या अध्यक्षतेखालील सदर समितीमध्ये ९ सदस्य, १ ज्येष्ठ नागरिक व १ सदस्य सचिव अशी एकूण १२ पदे आहेत. अशा या संजय गांधी निराधार योजना समितीची शुक्रवारी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता तहसिल कार्यालय दापोली यांचे दालनामध्ये बैठक पार पडली. सदरची बैठक ही संजय गांधी योजना व श्रावणबाळ सेवा योजनाकरिता प्राप्त झालेल्या प्रस्ताव/प्रकरणे मंजुरीकरिता आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये माहे जानेवारी २०२६ मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीची आचारसंहिता असलेने माहे जानेवारी व फेब्रुवारी २०२६ या दोन महामध्ये श्रावणबाळ योजनेची २३ व संजय गांधी योजनेची ५२ अशी प्राप्त झालेली एकूण ७५ प्रकरणे मंजुरीकरिता ठेवण्यात आली होती. सर्व प्रकरणे समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी तपासून त्यांस मंजुरी देण्यात आली. तळागाळातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत सदर योजना पोहोचवण्याचे आवाहन समितीतील सर्व सदस्यांना करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या भगवान घाडगे यांचा दापोली तालुक्यातील गाव वाड्या वस्त्यांमधील संपर्क पाहता तसेच त्यांचे राजकीय सामाजिक आदी विविध क्षेत्रातील योगदान त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द पाहता ते तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना न्याय देतील अशाप्रकारचा विश्वास हा घाडगे यांच्या नियुक्तीने व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

पहिल्याच बैठकित ७५ प्रकरणांना मंजुरी

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg