loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली

रत्नागिरी : शहरातील सुरक्षेसाठी बसवण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा देखभालीअभावी पूर्णपणे कोलमडली आहे. शहरातील ५६ कॅमेऱ्यांपैकी केवळ ७ ते ८ कॅमेरे सध्या सुरू आहेत. वारंवार सूचना देऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे ५६ ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले होते.या कॅमेऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंपनीला वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या.मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. संबंधित एजन्सीच्या कामात त्रुटी आढळल्याने आणि सूचनांचे पालन न केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. गुन्हा किंवा अपघात झाल्यास सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरतात. मात्र, बहुतांश कॅमेरे बंद असल्याने तपासात अडथळे येत आहेत. एजन्सीने आता काही कॅमेरे दुरुस्त केल्याचा दावा केला असला, तरी त्याची प्रत्यक्ष पाहणी करूनच खातरजमा केली जाईल. सध्या मुख्यालयातील कंट्रोल रूममधून या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवले जात असून, लवकरच सर्व ५६ कॅमेरे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

५७ पैकी केवळ ८ कॅमेरे सुरू; दोषी कंपनीवर गुन्हे दाखल

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg