loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे 'विरनोडकर कथाकथन स्पर्धा' उत्साहात

सावंतवाडी: मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून 'श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी' यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली विरनोडकर कथाकथन स्पर्धा आणि तिचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. ​कवी, नाटककार आणि ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. स्व. कमलताई विरनोडकर यांनी त्यांचे वडील स्व. गोविंद गणेश विरनोडकर यांच्या स्मरणार्थ ठेवलेल्या कायमस्वरूपी ठेव रकमेच्या व्याजातून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. ​यावर्षी सावंतवाडी तालुक्यातील एकूण ११ स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. कोळगाव येथील मुक्तद्वार ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ. दिशा चं. आकेरकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे: ​गट क्र. १ (इयत्ता १ ली ते २ री): ​प्रथम क्रमांक: स्वरांग प्रसाद गावडे (सावंतवाडी एज्यु. सो. प्रा. शाळा) ​द्वितीय क्रमांक: ओवी प्रसाद आडेलकर (शारदा विद्यालय, मळगाव) ​तृतीय क्रमांक: स्वराली विश्वेश पांगम (सावंतवाडी एज्यु. सो. प्रा. शाळा) ​ गट क्र. २ (इयत्ता ३ री ते ४ थी): ​प्रथम क्रमांक: गार्गी रुपेशकुमार गुंजाळ (सावंतवाडी एज्यु. सो. प्रा. शाळा) ​द्वितीय क्रमांक: सार्थक घन:श्याम वालावलकर (जि. प. शाळा नं. ४ सावंतवाडी) ​तृतीय क्रमांक: विभा प्रसाद नाईक (जि. प. प्रा. शाळा नं. १ कोळगाव)

टाइम्स स्पेशल

​संस्थेचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी समारोप प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, "आजकाल मुलांमध्ये वाचन अभिरुची कमी होत असून मूल्य संस्कृती हरवत चालली आहे. अशा परिस्थितीत मुलांमध्ये साहित्याची ओढ निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धांची अत्यंत आवश्यकता आहे." ​यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, सहकार्यवाह गणेश बोर्डेकर, संचालक राजेश मोंडकर, आणि वंदना सावंत उपस्थित होते. ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक ग्रंथपाल महेंद्र पटेल यांनी केले, तर स्पर्धेचे संचालन सहा. ग्रंथपाल रंजना कानसे यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महेंद्र सावंत व गुरुप्रसाद वाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg