loader
Breaking News
Breaking News
Foto

आजगाव विद्या विहार येथील जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धेत माणगाव विद्यालय प्रथम

लोक कल्याण शिक्षण संस्था संचलित ,विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव चे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या ३३ व्या स्मृतिदिना प्रित्यर्थ प्रशालेच्या वतीने जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला जिल्ह्यातून शाळांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून कै.गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून स्वागत गीताने व उपस्थित मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आजगाव सरपंच यशश्री सौदागर, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर, विलासानंद मठकर, संतोष वैज, धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक, प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत, शिक्षक पालक संघ सदस्य दिव्या काळोजी, राजेश वैज, ममता प्रभू, पुरुषोत्तम शेणई, दत्तगुरू कांबळी, डीएड कॉलेज प्राचार्य अमृतराव माळगे, तानाजी साळसकर, आत्माराम बागायतकर, शशिकांत मुळीक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी, आजगाव सरपंच, यशश्री सौदागर व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांचा त्यांच्या कार्याबद्दल प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना सौदागर व सातोसकर यांनी प्रशालेचे आभार व्यक्त करून प्रशालेच्या प्रगती साठी आपण नक्कीच सहकार्य करू असे आश्वासन दिले. तर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या आठवणी ताज्या करत गुरुवर्य सामंत सरांच्या स्मृतींना उजाळा दिला.

टाइम्स स्पेशल

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- प्रथम क्रमांक - १) श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव २) द्वितीय - शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदुर ३) तृतीय - नेमळे हायस्कूल, नेमळे तर उत्तेजनार्थ - १) स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी २) प्राथमिक शाळा तिरोडा नंबर १. या स्पर्धेचे परीक्षण राजेश वैज, ममता प्रभू यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक उत्तम भागीत तर सूत्रसंचालन काव्या साळवी यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg