loader
Breaking News
Breaking News
Foto

फाटक हायस्कूलच्या मैत्री १९८७ बॅचचे स्नेहसंमेलन

रत्नागिरी : येथील फाटक हायस्कूलच्या १९८६-८७ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन केळ्ये येथील रामकृष्ण आनंदवन कृषी पर्यटन केंद्रात उत्साहात साजरे झाले. फनी गेम्स, गाणी, गप्पा गोष्टी यासह शाळेच्या जुन्या आठवणी जागवत हे संमेलन दिवसभर रंगले. मैत्री ८७ चे हे पाचवे संमेलन होते. यापूर्वी २००४ मध्ये फाटक हायस्कूल, नंतर भाट्ये, गणेशगुळे आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात मैत्री ८७ ची संमेलने आयोजित करण्यात आली होती. या संमेलनात ८१ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावत संमेलनाचा आनंद लुटला. १९८७ च्या बॅचमधील अ, ब, क आणि ड या चारही वर्गातील माजी विद्यार्थ्यांचे हे संमेलन उत्साहात साजरे झाले. स्वामी स्वरूपानंद रचित प्रार्थना म्हणून संमेलनाची सुरवात झाली. तसेच गेल्या वर्षभरात निधन पावलेल्या शिक्षक, माजी मित्र-मैत्रिणींना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वांनी आपापले अनुभवकथन आणि परिचय सादर केला. अनेक माजी विद्यार्थी संमेलनाकरिता आवर्जून उपस्थित राहिले. लगोरी, संगीतखुर्ची आदीसह फनी गेम्सनी संमेलन अतिशय आनंदात साजरे झाले. संमेलनात माजी विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg