loader
Breaking News
Breaking News
Foto

सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल रत्नागिरीमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : शहरातील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान दिंडीने झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या वेशभूषेत तसेच सौरमालेतील ग्रहांच्या सुंदर वेशात सहभागी होत विज्ञानाचा संदेश दिला. या दिंडीमुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांमधून सर्जनशीलता, निरीक्षणशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा उत्तम संगम घडवून आणला. विज्ञान दिनाच्या निमित्ताने गटनिहाय (हाऊसवाईज) प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक यलो हाऊस, द्वितीय क्रमांक ब्ल्यू हाऊस तृतीय क्रमांक ग्रीन हाऊस आणि चतुर्थ क्रमांक रेड हाऊस यांनी प्राप्त केला. शाळेच्या शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत विज्ञानाविषयीची आवड जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg