loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा तालुका शांतता समिती सभेत शांततेचा संदेश : सण उत्सवात सलोखा जपूया; स.पो.नि रविंद्र पारखे यांचे आवाहन

म्हसळा, रायगड - शांतता प्रिय म्हसळा तालुक्यात विविध धर्मीय नागरिक आपापले सण उत्सव परंपरेनुसार आनंदात साजरे करत असतात.ही सलोख्याची परंपरा कायम ठेवत होळी उत्सव,पवित्र रमजान रोजे, ईद तसेच पुढील सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी शांतता समिती बैठकीत केले. अधिक बोलताना त्यांनी राज्यात गो-धन चोरी व गो-हत्या बंदी घातली असताना कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सणांच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल, असे आवर्जून सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभेत तालुका हिंदू समाज अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती महादेव पाटील, शहर हिंदू समाज सचिव सुशील यादव, मुस्लिम समाज उपाध्यक्ष डॉ.मुब्बशीर जमादार, जिल्हा शांतता समिती सदस्य अशोक काते, फारुख पेणकर आदी उपस्थितांनी चर्चेत सहभाग घेतला. सण उत्सव साजरे करताना हिंदू-मुस्लिम समाजात एकता व बंधुभाव कायम राखत वाईट प्रवृत्तींचा बीमोड करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. समिती सदस्यांनी धार्मिक भावना दुखावून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना पोलीस निरीक्षक पारखे यांनी कायदा हातात घेऊ नये, कोणतीही समस्या असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे सांगितले. सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करताना त्यांनी नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले. अनोळखी ऍप डाउनलोड करू नये, फसवणूक करणारे कॉल स्वीकारू नयेत, एपिके फाईल अपलोड करू नये असे मार्गदर्शन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

तालुक्यातील मजबूत सामाजिक व्यवस्था आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी सर्वांचे आभार मानत हिंदू बांधवांना होळीच्या आणि मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान व ईदच्या शुभेच्छा दिल्या. सभेला शांतता समिती सदस्य अनिल बसवत, सुनिल उमरोटकर, राजू लाड, भाई बोरकर, सुहेब हळदे, निकेश कोकचा, जब्बारसिंह राजपूत, महेश घोले, शशिकांत शिर्के, अमित महामुनकर, हेमंत नाक्ती, नबीस काझी, दिपेश जाधव, प्रसन्ना निजामपुरकर, दिपल शिर्के, हरिश्चंद्र नाक्ती, सुनिल टिंगरे, किरण पालांडे, राजेश आंजर्लेकर, संदिप गव्हाणे, कौस्तुभ करडे, पी.डी.जाधव, प्रसाद बोर्ले आदि मान्यवर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg