loader
Breaking News
Breaking News
Foto

युध्दाला तोंड फुटले!३० शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले

तेहरान-हे युध्द आज ना उद्या सुरु होणार याची सर्वांनाच कल्पना होती, परंतु ते आजच सुरु होईल हे कुणाच्या ध्यानी मनी नव्हते. सकाळी उजाडल्यावर सर्व काही सुरळीत सुरु झाल्यानंतर अकस्मात इराणच्या आकाशात इस्त्रायली व अमेरिकन लढावू आणि बॉम्बफेकी विमाने घोंगावू लागली, बॉम्ब वर्षाव सुरु झाला पाठोपाठ क्षेपणास्त्रे एकामागोमाग एक येऊन धडकू लागली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

३० शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले अमेरिका व इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरान मधील राष्ट्रपती भवन, गुप्तचर संस्थांची कार्यालये, सैनिकी मुख्यालये अशा विविध ठिकाणांवर हल्ले केले. केवळ लष्करी ठिकाणांवर नव्हे तर नागरी व नेत्यांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानांवर देखील एकामागोमाग एक हल्ले चढवण्यात आले. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह खोमेनी यांच्या निवासस्थानी व कार्यालयावरही जबरदस्त हल्ले चढवण्यात आले. इराणला नामोहरम करण्याचा इस्त्रायल व अमेरिकेचा हेतू असल्याचे स्पष्ट होते. इस्त्रायलच्या या मोहिमेला ‘लिओनस रोर’ (सिंह गर्जना) असे नाव देण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

इराणची ४०० क्षेपणास्त्रे अमेरिका व इस्त्रायलने हल्ले चढविल्यानंतर इराणची लष्करी यंत्रणा काही वेळातच सज्ज झाली व त्यांनी इस्त्रायलवर जोरदार हल्ले चढवण्यास सुरुवात केली. इराणने सुमारे ४०० क्षेपणास्त्रे इस्त्रायलवर डागली. इस्त्रायलच्या जेरुसलेम, हायफा व शेफेल्लाह या शहरांवर इराणने क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg