loader
Breaking News
Breaking News
Foto

युद्धामुळे सार्‍या जगाला फटका, सर्व विमानसेवा स्थगित

अशातच आता सर्वच अरब राष्ट्रांमधील विमानतळ व देशांच्या सरहद्दी विमानांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. भारतातील मुंबई, दिल्ली आदी आंतरराष्ट्रीय विमानतळांवरुन दुबई, कुवेत आदी सर्वच आखाती देशांमध्ये जाणारी विविध विमान सेवांची विमाने दुपारीच रद्द करण्यात आली. काही विमानांनी युध्द सुरु होण्यापूर्वी उड्डाण केले होते, त्या विमानांना तातडीने मेसेज देऊन माघारी परत फिरण्यास सांगण्यात आले. आता दुबई, कुवेतसह सर्व अरब राष्ट्रातील विमानतळ पूर्णपणे बंद आहेत व जगातील सर्वच विमान सेवांनी तेथे जाणार्‍या आपल्या सर्व विमान सेवा त्वरीत स्थगित केल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सार्‍या जगाला फटका अमेरिका व इस्त्रायलने इराणवर प्रचंड मोठा हल्ला चढवताच जणू महायुध्दाला तोंड फुटले. यामध्ये आणखी कोणते कोणते देश ओढले जाणार हे पुढील काळात स्पष्ट होईल. याचा फटका सार्‍या जगाला बसेल, प्रचंड मनुष्यहानी होईल, लाखो नव्हे तर करोडो लोकांचे जीवन मरण विस्कळीत होईल, करोडो नागरिकांनी जबर फटका सहन करावा लागेल, आखाती देशांतून येणारे तेल बंद झाल्याने पेट्रोल, डिझेलसह तेलाच्या किमती प्रचंड वाढतील अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg